गोळशी | वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील झारली पाडा येथील महिलांचे गोळशी फाटा परिसरातील अवैद्य दारू धंदे बंद करण्यासाठी दिंडोरी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना साकड घालण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही वर्षा पासून दिंडोरी तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात अनेक अवैद्य धंदे चालू असून त्याच पैकी गोळशी फाटा येथील अनाधिकृत देशी व विदेशी मद्य अवैध रित्या गेल्या कित्येक दिवसापासून येथील हॉटेल महाराजा व काही स्थानिक नागरिकांकडून बेडरपणे रात्र दिवस चालू आहे.
या ठिकाणच्या नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत असून काही स्त्रियांचे संसार उघड्यावर आले आहे तर काही ना रोजच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या भागातील नागरिक आपले जीवन मोल मजुरी करून व्यतीत करत असून महिलांनी दररोज शेतमजुरीसाठी बाहेर गावी जावे लागत असून संध्याकाळी आल्यावर नवरा मारझोड करून दारूसाठी पैसे मागून त्याचे मद्यपान करतात. यामुळे येथील सर्वच महिलावर्ग व ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.
या बाबत योग्य ती कार्यवाही करून दारू विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ व महिलावर्ग करत आहे
मी स्व:त देखील अशाच गरीब कुटुंबातून आलो आहे. या परिस्थितीची मला पूर्ण जाणीव आहे. हे सर्व प्रसंग मी जवळून पाहिले असल्याने यामुळे महिला वर्गाला होणार त्रास समजू शकतो. मी माय भगिनींच्या संसाराठी सदैव त्यांच्या पाठीशी आहे. संबंधीतांवर योग्य ती कार्यवाही करणार.
– दिंडोरी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण