Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारशेतीची खातेफोड करून सातबारा तयार करून देण्यासाठी १५ हजारांची मागणी

शेतीची खातेफोड करून सातबारा तयार करून देण्यासाठी १५ हजारांची मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR

शेतीचे खातेफोड करून तीन्ही भावांचे नावाने सातबारा तयार करून देण्याच्या १५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी रोजगाव ता.साक्री, जि.धुळे येथील महिला तलाठ्यासह तिघांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे वडिल व भावाच्या नावाने रोजगाव ता.साक्री जि.धुळे येथील शिवारात सर्वे क्र.१५५/६२ व १५५/६३ या शेतीचे खातेफोड करून तीन्ही भावांच्या नावाने सातबारा तयार करून देण्याच्या मोबदल्यात रोजगाव येथील तलाठी श्रीमती ज्योती के. पवार (सध्या नेमणूक-मंडळ अधिकारी, तामथरे मंडळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे), संगणक ऑपरेटर योगेश कैलास सावडे, कोतवाल छोटू भिकारी जाधव यांनी एकूण ४० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदाराकडून १० हजार व मार्च-२०२३ मध्ये तक्रारदाराच्या वडिलांकडून १० हजार असे एकूण २० हजार रूपये अगोदरच घेतले.

त्यानंतर दि. १८ एप्रिल २०२३ रोजी तक्रारदारानी लाच लुचपत प्रतीबंधक विभागाच्या नंदुरबार कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर पंच साक्षीदारासमक्ष पडताळणी केली असता तलाठी श्रीमती ज्योती पवार यांनी खातेफोड करून देण्याच्या मोबदल्यात उर्वरित २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर त्याच दिवशी तक्रारदार श्रीमती पवार यांना लाचेची रक्कम देण्यास गेले असता त्या मिळून आल्या नाहीत. परंतू कार्यालयातील संगणक ऑपरेटर योगेश सावळे याने तक्रारदाराला पैसे आणलेत का? असे विचारून लाचेची मागणी केली. तसेच दि. २९ मे २०२३ रोजी सापळा कार्यवाहीदरम्यान यातील योगेश सावळे व कोतवाल छोटू जाधव (सजा-जैताणे) यांनी श्रीमती ज्योती पवार यांनी सांगितल्यावरून जैताणे येथील तक्रारदाराच्या राहत्या घरी लाचेची रक्कम घेण्याकरीता जावून पुन्हा पंच साक्षीरांसमक्ष लाचेची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरूद्ध निजामपूर पोलीस स्टेशन ता.साक्री, जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पर्यवेक्षण अधिकारी तथा उपअधीक्षक राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान वाघ, सह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती माधवी वाघ, सापळा कार्यवाही पथक पोहवा विजय ठाकरे, पोहवा ज्योती पाटील, पोना मनोज अहिरे, पोना देवराम गावित, पोना संदीप नावाडेकर व पोना/अमोल मराठे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या