Monday, November 18, 2024
Homeमुख्य बातम्याSSR : मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करून चौकशी करा

SSR : मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करून चौकशी करा

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह(mumbai police commissioner parambir singh) यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपाचे आमदार

- Advertisement -

अतुल भातखळकर(bjp mla atul bhatkhalkar) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांना पत्र लिहून परमबिर सिंह यांचं निलंबन करण्याची मागणी केली आहे. “मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आणि अपघाती मृत्यू अशी नोंद केली. कलम ३११(२)(ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकता.सुप्रीम कोर्टाने उपलब्ध माहितीच्या आधारावर चौकशीची परवानगी दिली. पण मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नाही आणि त्यामुळे न्यायावर परिणाम झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवर सुप्रीम कोर्टानेही नाराजी व्यक्त केली होती. अनेक बाबी समोर येऊनही त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही” असे आ. भातखळकर यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या