चांदवड । प्रतिनिधी Chandwad
कांदा पिकावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत शासनस्तरावर शिफारस व्हावी अशी कांदा उत्पादक शेतकर्यांची महत्वपूर्ण मागणी आ. डॉ. राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
कांदा दरातील घसरण थांबून दर वाढीस चालना मिळण्यास मदत होणार आहे.दरवर्षी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जातो. चालू वर्षात राज्यभरात चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा येत्या काही दिवसांमध्ये बाजारात येणार आहे. सद्यस्थितीमध्ये दोन महिन्यापासून कांद्याचे सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल भाव बाजारात सुरू आहे.
शेतकरीवर्ग चिंतेत सापडला असल्याचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चे दरम्यान अवगत करून दिले आहे. 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे याबाबतची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत असल्याचे देखील आ.डॉ. आहेर यांनी सांगितले.