Friday, May 3, 2024
Homeनाशिकएक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करा; रेल्वे व्यवस्थापकांना साकडे

एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करा; रेल्वे व्यवस्थापकांना साकडे

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव रेल्वे स्थानकावरील ( Nandgaon railway station ) काशी, कामायनी, महानगरी, जनता व झेलम एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत व्हावे तसेच पादचारी पूल व स्टेशन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता (Central Railway Manager Vivek Kumar Gupta )यांनी येथे बोलताना दिले.

- Advertisement -

नांदगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विवेक गुप्ता यांनी भेट दिली असता युवा फाऊंडेशन संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह प्रवाशांनी त्यांची भेट घेत निवेदन सादर केले. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गत अनेक महिन्यांपासून नांदगाव रेल्वे स्थानकावर काशी, कामायनी, महानगरी, जनता व झेलम एक्स्प्रेसचे थांबे बंद करण्यात आल्याने मुंबई व जळगावकडे जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत.

शहर व तालुक्यातील प्रवाशांना वरील रेल्वेगाड्यांसाठी बसण्यासाठी व उतरण्यासाठी मनमाड येथे जावे लागते. सदर एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे त्वरित पूर्ववत करावेत व स्टेशन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत तसेच लेंडी नदीच्या बाजूने मागील वर्षी अंडरपास तयार करण्यात आलेला आहे.

अंडरपासमुळे शहराचे दोन भाग पडले असून दोन्ही भागांचे अंडरपासमध्ये पाणी साचल्यास एकमेकांशी संपर्क तुटतो. यामुळे जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत अहे. त्यामुळे नांदगाव शहराला जोडण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पूल तयार करून नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळातर्फे गुप्ता यांच्याकडे करण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या