Saturday, October 12, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील पर्वत, डोंगररांगांचे सीमांकन

जिल्ह्यातील पर्वत, डोंगररांगांचे सीमांकन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील Trimbakeshwar Taluka ब्रह्मगिरी पर्वतावर Bramhagiri Mountain अवैध उत्खनन झाल्यानंतर पर्वतरांगा व डोंगररांगांचे सीमांकन करण्याचा Demarcation of mountains मुद्दा पुढे आला आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या ठिकाणांचे सीमांकन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे collector- Suraj Mandhare यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यानुसार 156 ग्रामपंचायतींना Grampanchayats त्यांच्या हद्दीत तातडीने सीमांकन करण्यास जिल्हा परिषदेने सांगितले आहे.

- Advertisement -

ब्रह्मगिरी पर्वतासह आसपासच्या संतोषा, भागडी डोंगर आणि सारुळ येथील अवैध खडी उत्खननाचा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. या उत्खननाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही प्रथमदर्शनी, उत्खनन नियमांचे सर्रास उल्लंघन झाले असल्याचे निरीक्षण अहवालात नमूद केले आहे. परंतु, आता या अहवालातील काही मुद्द्यांची पुनर्तपासणी करण्यात येत आहे. समितीने आपल्या अहवालात पर्यावरणीदृष्ट्या संवेदनशील भागाचे सीमांकन करण्याची सूचना केली आहे.

यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या पर्वतरागांचे सीमांकन करून पर्यावरणीय संवेदनशील भागात उत्खनन, वृक्षतोड, बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेतलाआहे. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून जिल्ह्यातील अशा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागाचे सीमांकन करण्याचे निर्देश दिले आहेत.

या आधारे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग असलेल्या ग्रामपंचायतींना पत्र पाठवून तेथील पर्वत वा डोंगररांगांचे सीमांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. या सीमांकनासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत पातळीवर समिती स्थापन करायची असून त्यात स्थानिक वनरक्षक, तलाठी, कृषीसहायक यांचा सदस्य म्हणून समावेश करायचा आहे.

ग्रामसेवक हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. ही समिती पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागाची प्रत्यक्ष पाहणी करून सीमांकन निश्चित करेल. तसेच त्याचा नकाशाही तयार करणार आहे. याबाबत कार्यवाही करून संबंधित ग्रामपंचायतीने नकाशे तयार करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या