जळगाव : Jalgaon
तहसिल कार्यालया समोरील जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा वेल्फेअर कमिटीची (जिल्हा रिव्हेन्यु क्लब) ची इमारत ही अत्यंत जिर्ण व धोकादायक झालेली आहे या इमारतीचा समोरील भाग काही दिवसांपुर्वीच कोसळला होता.
- Advertisement -
सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही, याबाबतचे वृत्त दै.देशदूतने दि.५ जुलै रोजी प्रकाशीत केले होते. याची दखल घेत आज दि.१३ रोजी या इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यात आला. यामुळे तहसिल कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरीकांनी व वेंडर यांचेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.