Monday, July 22, 2024
Homeनाशिकबँकांच्या खाजगीकरणाविराेधात धरणे आंदोलन

बँकांच्या खाजगीकरणाविराेधात धरणे आंदोलन

नाशिक | Nashik

- Advertisement -

केंद्र सरकारकडून बँक खाजगीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. या विरोधात…

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशन व ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन तर्फे रविवारी (दि. १३) गडकरी चाैकातील महाराष्ट्र बँकेच्या क्षेत्रिय कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

रविवारी संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्हानिहाय व बँकेच्या विभागनिहाय कार्यालयासमोर सकाळी ११.०० वाजता शपथ ग्रहणाचा कार्यक्रम करण्यात आला.

बँक खाजगीकरणाच्या विरोधात लढा सुरू करण्याची ही प्रथम पायरी असल्याने शपथ ग्रहण करून या लढ्याची सुरुवात करण्यात आली.

या आंदाेलनात एआयबीईएचे नाशिकचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिरीष धनक, एआयबीआेएचे उपाध्यक्ष कॉम्रेड विजय गायकवाड व कॉम्रेड विनोद मोझे, राजन भालेराव यांच्यासह नाशिक शहर व जिल्ह्यातील बँक आॅफ महाराष्ट्राचे आधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते.

- Advertisment -

ताज्या बातम्या