Monday, July 22, 2024
Homeनाशिकडेंग्यू, चिकनगुनियामुळे नाशिककर हैराण, अशी घ्या काळजी

डेंग्यू, चिकनगुनियामुळे नाशिककर हैराण, अशी घ्या काळजी

नाशिक | Nashik

- Advertisement -

जिल्ह्यात (Nashik District) डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनियाच्या (Chikungunya) वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. करोना (Corona) आणि डेंग्यू यांची लक्षणे सारखीच असून वेळीच चाचणी करून आजाराचे निदान करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने सांगितले आहे..,

दरम्यान, करोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) संपत नाही तोच तिसऱ्या लाटेची तयारी सुरु झाली आहे. मात्र, करोनाचे संकट समोर असताना आता पावसाळ्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढू लागले आहे.

दोन्ही आजारात ताप तसेच सर्दी, खोकला ही प्राथमिक लक्षणे असल्याने नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. करोना असताना डेंग्यूची लक्षणे असल्याचे समजून दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. करोना आणि डेंग्यू दोन भिन्न गोष्टी असल्या तरी काही लक्षणे सारखी आहेत.

दोन्ही आजारात ताप हा सर्वात समान घटक असला तरी सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष करू नये. बाकी अन्य लक्षणे अत्यंत भिन्न आहेत. अंगावर रॅश उठतात तसेच रुग्ण बेशुध्द पडू शकतो. डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी होतात. रक्तस्त्रावदेखील होतो. करोनात मात्र तसे होत नाही.

करोना आणि डेंग्यू दोन्ही आजाराचे प्राथमिक लक्षण म्हणजे ताप येणे होय. सर्दी , खोकला आणि त्यामुळे होणारी खवखव, किंवा घशात होणारा त्रास तसेच करोनामध्ये ताप उतरत नाही आणि तीन दिवस ताप तसाच राहिल्यानंतर चाचणी केली जाते. डेंग्यूमध्ये ताप येतो आणि प्लेटलेट्स कमी होतात.

अशी घ्याल काळजी

करोना संसर्ग टाळण्यासाठी पाणी उकळून घेतले पाहिजे. तसेच वाफ देखील घेतली पाहिजे. डेंग्यू टाळण्यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे हे महत्वाचे आहे. डेंग्यू पसरविणारे डास हे शुद्ध पाण्यातच होत असतात. त्यामुळे घरातील साठविलेले पाणी बदलले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या