नाशिक । प्रतिनिधी Nashik
चांंदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत रंगली आहे. दोघा आहेर बंधूंच्या भांडणात तिसर्याचा लाभ होतो का? अशी स्थिती मतदारसंघात निर्माण झाली आहे.
चांदवड-देवळा मतदारसंघात बहुतांशी वेळा भाजपने बाजी मारली असली तरीे दोन वेळा काँग्रेस उमेदवारांनी या बालेकिल्याला सुरुंंग लावण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी उत्तम भालेराव, शिरीषकुमार कोतवाल यांनी बाजी मारुन दाखवली. यंदा तर आ.डॉ राहुल आहेर यांच्या घराण्यातच दोघा भावांचा वाद चव्हाट्यावर आला. केदा आहेर यांनी बंड करुन डॉ. आहेर यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी प्रहारच्या गणेश निंबाळकर या शेतकरी पुत्रानेही प्रस्थापितांसमोर कडवे आव्हान उभे केलेले दिसत आहे.
निंबाळकर यांच्यासाठी गावोगावी लोकांकडून मदत निधी गोळा होत आहे. खासदार भास्कर भगरे यांच्यासाठी जसा निधी जमा केला गेला तसाच निधी आता गोळा होत आहे. काम करण्याची धडपड आणि प्रामाणिकपणाच्या बळावर निंबाळकर चर्चेत आले आहेत. याचाच प्रत्यय विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणार्या गणेश निंबाळकरांनी प्रस्थापित उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे केल्याने आहेर बंधूंची डोकेदुखी वाढली आहे.
मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर, महाविकास आघाडीकडून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल तर भाजपतील बंडखोर केदा आहेर हे प्रस्थापित उमेदवार रिंगणात आहेत. मागील चार-पाच वर्षांपासून गणेश निंबाळकरांनीे कांदाप्रश्न, विजेचा प्रश्न, कांदा निर्यातबंदी, पीकविमा, नुकसान भरपाई, बाजार समितीतील समस्या आदींबाबत आवाज उठवला. प्रसंगी आंदोलनेही केली. शेतकर्यांना गणेशची ही आक्रमकता खूपच भावली. या आक्रमकतेतूनच जनतेने गणेश निंबाळकराना आर्थिक पाठबळ उभे करून दिले. म्हणूनच मतदारसंघात आता दोन आजी-माजी आमदार व दोन नवखे अशी चौरंगी लढत होत आहे.
आहेर घराण्यातील वादामुळे विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नारपार वरुन दखणी व खानदेश आसा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत होती. मात्र दखणी नेतेच फुटल्याने आता हा वाद राहिला नाही. हा वाद कायम राहून पाणी प्रश्न पेटला असता तर चादवडच्या उमेदारांना अधिक लाभ झाला असता, असा अंदाज व्यक्त होत होता. दोघा भावांंच्या वादात आपल्याला लाभ होईल, अशी कोतवालांना आशा आहे.
डॉ. राहुल आहेर विजयी हॅटट्रिक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसे झाल्यास मंत्रीपदाची माळ गळ्यात पडेल, अशी त्यांंना अपेक्षा आहे. त्यांच्याबाबत देवळ्यात सहानुभूती असली तरी दोघा भावांच्या वादामुळे मत विभाजन अटळ असल्याचे बोलले जात आहे. मतदारही संभ्रमात पडले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिऱीष कोतवाल यानी लोकसभा निवडणुकीप्रमाणे चांंगले नियोजन केले तर आहेरांच्या बालेकिल्याला त्यांंना सुरुंग लावण्यात यश येऊ शकते. दहा वर्षापूर्वी भयमुक्त देवळा, भितीमुक्त देवळा असे अभियान आहेर बंधूंविरुध्द राबवले होते. आता पुन्हा त्याची आठवण होत आहे.
केदा आहेर यांंच्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. त्याचा प्रत्यय केदा आहेर यांना मविप्र निवडणुकीत पराभावातून आला होता. या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यातच स्थानिक निवडणुकीत नको तितक्या हस्तेक्षेपामुळे गावागावातील ग्रामस्थ केदा आहेर यांच्या दबावतंत्राविरुध्द बोलू लागले आहेत. भयमुक्त देवळ्यासाठी मतदारांनी राहुल आहेर यांच्यावर विश्वास टाकला होता. मात्र राहुल यांंनी ठेकेदारी व दबावतंंत्राचे राजकारण करणार्या केदा आहेर यांंच्यावर भिस्त ठेवली होती. त्यामुळेच आहेर विरोधकांंना यंदा आायते कोलित मिळाले आहे. ते त्याचा आगामी काळात कसा उपयोग करुन घेतात त्यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.