Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमदेवळाली प्रवरेत एटीएम फोडले; लाखो रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार

देवळाली प्रवरेत एटीएम फोडले; लाखो रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एसीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राहुरी फॅक्टरी सह देवळाली प्रवरा परिसरात चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नुकतेच आठ दिवसांपूर्वी येथील चार बंगले चोरट्यांनी फोडले. त्याचबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली, तर मागील दोन दिवसांपूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणार्‍या चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान, आज देवळाली प्रवरा शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी फोडून काही रक्कम लंपास केली आहे. किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकली नाही.

- Advertisement -

घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व एलसीबीचे पो. नि. किरणकुमार कबाडी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणे तसेच एलसीबीचे अतुल लोटके, रमिराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, महादेव भांड आणि ठसे तपासणी पथकाचे गणपत झरेकर, सोहेल सय्यद यांनी धाव घेतली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...