Saturday, June 15, 2024
Homeनगरदेवळाली प्रवरेत बिबट्याचा मुक्त संचार

देवळाली प्रवरेत बिबट्याचा मुक्त संचार

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

- Advertisement -

देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या घराजवळ बिबट्याचा (Leopard) मुक्त संचार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला (Dog Attack) करून त्यास ठार केल्याची घटना घडली आहे.

देवळाली प्रवरा (Deolali Pravara) परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. देवळाली प्रवरा-गणेगाव रस्त्यावर माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या घराजवळ रात्रीच्या बिबट्या (Leopard) आला. बराच काळ हा बिबट्या परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले. बिबट्याने (Leopard) पाळीव कुत्र्यावर हल्ला ठार त्यास ठार केले आहे.

तसेच गेटमधून आतमध्ये प्रवेश करून बिबट्या आतमध्ये मुक्तपणे फेरफटका मारल्याचे यावेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढला असल्याने वनविभागाने (Forest Department) तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल कदम, संदीप कदमसह नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या