Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमदेवळाली प्रवरा येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

देवळाली प्रवरा येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील लाख रस्ता परिसरातील मुसमाडे वस्ती येथे एका विहिरीत तरुणाचा मृतदेह रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर मयताची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी त्याचे वर्णन समाज माध्यमावर टाकल्याने या मयत तरुणाची ओळख पटली असून सौरभ भारत शिंदे (वय 25 वर्षे) रा. कारवाडी, गणेशनगर देवळाली प्रवरा असे असल्याचे समजले. देवळाली प्रवरा येथील मुसमाडे वस्ती येथे सुभाष मुथा यांच्या शेतातील विहिरीत 4 ऑगस्ट रोजी एक अनोळखी इसमाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आलेला होता. सदर मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी त्याच्यासोबत कुठलेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे नव्हती. पाण्यात मृतदेह सडल्यामुळे चेहराही समजून येत नव्हता.

- Advertisement -

सदर मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तपास करताना पोलीस हवालदार हनुमंत आव्हाड यांनी सदर मयताचे फोटो समाज माध्यमावर पाठवून ओळख पटविण्याचे आवाहन केले असता, काल दि. 5 ऑगस्ट रोजी सदर मयताचे वडील भारत बाजीराव शिंदे (वय 52 वर्ष), धंदा- मजुरी, रा. गणेशनगर, देवळाली प्रवरा यांनी समक्ष येऊन मयत इसम हा त्यांचा मुलगा सौरभ भारत शिंदे असल्याचे सांगितले. तो दि. 1 ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झालेला होता. परंतु, तो मनोरुग्ण असल्याने व नेहमी घरातून निघून जात असल्यामुळे त्याची हरवल्याबाबतची तक्रार दिलेली नव्हती. सदर मृत इसमाची ओळख पटल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी भारत शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पो. नि. संजय ठेंगे, पो. उपनि. धर्मराज पाटील, स.फौ. विष्णू आहेर, पो. ह. हनुमंत आव्हाड, पो. ना. बागुल यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...