Saturday, May 4, 2024
Homeनाशिकविभागीय महिला लोकशाही दिन सोमवारी

विभागीय महिला लोकशाही दिन सोमवारी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

नाशिक विभागाच्या महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उप आयुक्त सुरेखा पाटील यांनी ही माहिती दिली. राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे.

त्या अंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपिठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा तसेच महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ज्या काही समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले असतील व त्यांना समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत, असे आवाहन उप आयुक्त सुरेखा पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या