Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजउपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिन्नर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिन्नर दौऱ्यावर

- Advertisement -

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या ११ ऑक्टोबर २०२४, शुक्रवारी रोजी सिन्नर तालुक्याच्या दौर्‍यावर येत असून तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता पंचाळे येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार माणिकराव कोकाटे व माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे यांनी दिली.

देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे या 157 कोटी रुपयांच्या व खोपडी ते मिरगाव या 154 कोटी रुपयांच्या बंदिस्त पूर कालव्यांचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. तर देवपूर येथे जलपूजन करण्यात येणार आहे.

लासलगाव, विंचूर ते सोमठाणे-पंचाळे- पांगरी-मर्‍हळ-मानोरी-हिवरे-पाडळी फाटा-ठाणगाव ते म्हैसवळण घाटमार्गे टाकेद-वासाळी-इंदोरे-खडकेद-आंबेवाडी ते समृद्धी हायवे या महत्त्वाकांक्षी 146 किलोमीटर लांबीच्या व 940 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे अजितदादा पवार यांच्या हस्ते पंचाळे येथेच भूमिपूजन करण्यात येणार आहे.

उजनी येथील 33/11 केव्हीच्या 3 कोटी 64 लाख रुपयांच्या सबस्टेशनचे पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आ. कोकाटे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राष्ट्रपती

President Droupadi Murmu: ‘न्यायालयीन आदेशांद्वारे वेळेची मर्यादा घालता येते का?’; राष्ट्रपती...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षावर मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला होता. राज्यपाल विधेयकांना अनिश्चित कालावधीसाठी रोखू...