Saturday, May 4, 2024
Homeनाशिकउपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आज विभागाचा आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आज विभागाचा आढावा

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हे बुधवारी (दि.१०) नाशिक दौर्‍यावर असून नाशिकरोड येथील महसूल कार्यालयात ते विभागातील पाचही जिल्ह्यांचा जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतीम करण्यासाठी आढावा बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी विभागनिहाय आढावा घेतला जातो. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे विभागाच्या बैठका घेऊन सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतीम करण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेतात.

अजित पवार आज नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक घेतील. सकाळी ९.३० वाजता बैठकिला सुरुवात होईल. नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांना वेळ देण्यात आल्या असून त्यांचा आढावा घेतला जाईल. बैठकिला त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या