पुणे | प्रतिनिधी Pune
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून समस्त वारकरी, धारकरी, कष्टकरी, शेतकरी आणि लाडक्या बहिण भावंडांचा असल्याचे मत व्यक्त केले. संत तुकाराम महाराजांनी ३७५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या गाथांमधील तत्वज्ञान आजही कालातीत आहे. ४०० वर्षांपूर्वी तुकोबारायांनी हे तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहून ठेवले, खरे तर मराठी भाषेचा अभिजातपणा सिद्ध करण्याचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
धर्माच्या रक्षणाप्रमाणे निसर्गाचे रक्षण करणे हेदेखील आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. इंद्रायणी नदीला भेट दिली होती या नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास अहवाल तयार असून त्यालाही मी मान्यता दिलेली आहे. मात्र नुसते शासनानेच नव्हे तर आपण सर्वांनी नदी स्वच्छतेची चळवळ ही लोकचळवळ करायला हवी अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच यानंतर संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या मंदिरात जाऊन मोठ्या भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेतले.
यावेळी देहू देवस्थान समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार शरद सोनावणे, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले तसेच विविध संत देवस्थानांचे विश्वस्त आवर्जून उपस्थित होते.