मुंबई ।
आज रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. या वेळी अमित ठाकरे, मंत्री उदय सामंत आणि खा. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित असल्याचे समजते. दरम्यान अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता होती.
आजच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर रात्री साडे अकरा वाजे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला जेवनाचे निमंत्रण दिले होते त्या साठी मी शिवतीर्थावर आलो होतो. विधान सभेच्या निवडणुका झाल्यानंतर कधीचे भेट घेण्याचे चालू होते, स्नेहभोजन झाले, यात हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीना उजाळा दिला, अनेक जुन्या गोष्टी , आठवणी , घटना यावर बऱ्याच गप्पा झाल्या. ही सदिच्छा भेट होती. यावर राजकीय अर्थ काढण्याची काही गरज येत नाही.असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.