दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून आज दिल्लीत शिवसेना शिंदे गटाच्या सर्व खासदार यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सोबत भेट घेतली या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदी यांची देखील भेट घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन देईल असेही त्यांनी या भेटीत पंतप्रधानाना सांगितले.
या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याव निशाणा साधत म्हणाले की जनता कामाच्या जोरावर मतदान करते, नावावर नाही ; आम्ही लोककल्याणच्या मार्गाकडे गेलो, ते दहा जनपथकडे गेले, बाळासाहेबांना आवडलं नसतं ते त्यांनी केलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली.




