Thursday, April 9, 2026
Homeनाशिकउपकार्यकारी अभियंता 'एसीबी'च्या जाळ्यात

उपकार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक। प्रतिनिधी Nashik

वीज मीटर बसवून देण्याच्या बदल्यात व्यावसायिकाकडून एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या पिंपळगाव उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यास शुक्रवारी एसीबीने पकडले. किसन भीमराव कोपनर(वय ४४, रा. पार्कसाईड, हनुमाननगर, आडगाव शिवार, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणी दरम्यान काेपनर यांनी पंचासमक्ष एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती रक्कम (दि. ५) स्विकारताना एसीबीचे पाेलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी अटक केली.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...