पुणतांबा । वार्ताहर
श्रीक्षेत्र पुणतांबा येथे याज्ञसेनी मंदिराच्या उत्तरेकडे गोदावरी नदी काठावर असलेल्या महादेव मंदिरातील मूर्तीची अज्ञात इसमांनी विटंबना केल्यामुळे पुणतांबा ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आज सकाळी ६वाजेच्या दरम्यान ही घटना झाल्याचे समजताच भाविकांनी मंदिरा कडे जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजावून घेतली मंदिरासंमोरील नंदीची मूर्ती तसेच गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीची अवस्था बघीतल्यानंतर ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या. ह्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान येथील आशाकेंद्र चौकात रास्ता रोको केला व घटनेतील आरोपी चा तातडीने शोध लावून अटक करण्याचीमागणी केली.
१३ डिसेम्बर रोजी रेल्वे स्टेशन समोर असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तीची ही विटंबना करण्यात आली होती. आता पुन्हा दुसरी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गावात पोलीसांचा वचक राहिला नाही पोलीसांच्या तातडीने बदली करण्याची मागणी अनेकांनी केली. घटनेच्या निषेधार्थ पुणतांबा बंदचे आवाहन करण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.