Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedआजचे दिनविशेष (दि. १९ जुलै २०२०)

आजचे दिनविशेष (दि. १९ जुलै २०२०)

– देशाच्या विकासात बँकींग व्यवस्था महत्त्वाची भुमिका बजावते. भारतात बँकींग व्यवस्था 19 व्या शतकात ब्रिटीशांच्या काळातच सुरू झाली. 1806 मध्ये बँक ऑफ बंगाल, 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास सुरू झाली होती. या तीन बँकांच्या एकत्रिकरणातून इम्पेरिअल बँकेची स्थापना झाली.

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 ची. इम्पेरिअल बँक स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये भारतीय स्टेट बँक झाली. हा इतिहास यासाठी कारण 1969 मधील 19 जुलै रोजी देशाच्या बँकींग इतिहासातील एक मोठा निर्णय झाला. देशातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयीकरण या दिवशी झालं.

- Advertisment -

ताज्या बातम्या