Thursday, November 21, 2024
Homeदिवाळी अंक २०२४आदिवासींचे थक्क करणारे लोकजीवन- प्रा. आनंद बोरा - अध्यक्ष, नेचर क्लब...

आदिवासींचे थक्क करणारे लोकजीवन- प्रा. आनंद बोरा – अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक

निसर्गाशी संवाद साधत जगणार्‍या या खोर्‍यातील लोकसमूहांचा दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार सह्याद्रीमध्ये बघावयास मिळतो. लोकजीवनात गीत, नृत्य, नाट्य, हस्तकला आदी सर्वच आविष्कार दैनंदिन गरजेचा भाग असतात. त्यातही सह्याद्री पर्वतरांगांमधील आदिवासींची लोककला बहुरंगी व थक्क करणारी आहे.

आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी ‘लोककला’ प्रसिद्ध आहे. अशी लोककला बघायची असेल, तर सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये जायलाच हवे. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रतटाच्या शेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. अंंदाजे १,६०० किलोमीटर लांंबीची ही डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून सुरू होते. निसर्गाशी संवाद साधत जगणार्‍या या खोर्‍यातील लोकसमूहांचा दैनंदिन जीवनाशी संंबंधित परंतु, कलात्मक आविष्कार सह्याद्रीमध्ये दिसतो. लोकजीवनात गीत, नृत्य, नाट्य, हस्तकला इ. सर्वच आविष्कार दैनंदिन गरजेचा भाग असतो. सह्याद्रीमध्ये आदिवासींची कला बहुरंगी आहे. घरावरील नक्षीकाम, स्मशानातील कोरीव खांब, समारंभांतील पोषाख, आभूषणे, मुखवटे, देवदेवतांच्या आकृत्या आदी प्रकारांत आदिवासींची कलादृष्टी दिसून येते. टोप्या, टोपल्या, वाद्ये, मासे पकडण्याची जाळी इत्यादींतील रंगसंगती, कोरीव काम व नक्षीकाम कलात्मक असते. साजशृंंगाराची आदिवासींना आवड असते. अंगावर गोंदवून घेणे, समारंभप्रसंगी शरीरास रंग लावणे, केशभूषा करणे, गळ्यात रंंगीबेरंगी माळा घालणे हे सर्व प्रकार भटकंती करताना बघावयास मिळतात.

- Advertisement -

सह्याद्रीमध्ये निसर्गसंपदा विपुल आहे. आदिवासींच्या दागिन्यांत कवड्यांचा उपयोग केलेला दिसतो. आदिवासी स्त्रिया वेणीवर कवड्यांचा गजरा घालतात, कवडी ही मानवी डोळ्याचे प्रतीक मानतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पाड्यांवर फणीचा वापर प्राचीन काळापासून करण्यात आल्याचे दिसून येते. घरांच्या दारांवरही फण्यांच्या आकृत्या कोरण्यात येतात. सह्याद्रीमध्ये पक्ष्यांचा हक्काचा अधिवास आहे. त्यामुळेच शेकडो जातीचे पक्षी या परिसरात आहेत. बर्‍याच जमातींचे लोक आजही निरनिराळ्या पक्ष्यांची पिसे डोक्यावर खोचतात. पश्चिम घाट हा अनेक लहानमोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. यापैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. नद्यांमुळे वेगवेगळ्या लोकसंस्कृती बघावयास मिळतात. १९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संंरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५ टक्के क्षेत्रफळावर पसरलेला असला, तरी भारतातील उंच वाढणार्‍या झाडांच्या १५ हजार जातींपैकी सुमारे ४ हजार जाती (२७ टक्के) इथेच सापडतात. यापैकी सुमारे १ हजार ८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री पर्वतरांगेत उभयचर प्राण्यांच्या जवळपास ८४ जाती, १६ पक्ष्यांंच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १ हजार ६०० प्रकारची फुलझाडे आढळतात, जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. औषधी वनस्पतींची माहिती असणारे अनेक पाडे आपल्याला सह्याद्रीमध्ये दिसतात. तसेच खाद्य संंस्कृती हा देखील सह्याद्रीमधील एक महत्वाचा घटक आहे. पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर यांंच्या पुढाकारातून जीर्णोद्धार झालेली अनेक मंदिरेदेखील दिसतात. सह्याद्री पर्वतरांंगेत वसलेल्या या प्राचीन मंंदिरांच्या कामातील टिकाऊपणा पाहताक्षणी लक्षात येतो.

पावसाळ्यात बहरणार्‍या हिरवाईमुळे मंंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलत असल्याने पर्यटनस्थळ म्हणून आता या देवस्थानांकडे भाविक आकर्षित होत आहेत. डोंगरी देव उत्सव हा आदिवासी बांधवाचा उत्सव सह्याद्रीमध्ये बघावयास मिळतो. प्रामुख्याने उत्तम शेती आणि आरोग्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. आदिवासी निसर्गाला देवता मानतात. त्यामुळे त्यांंचे जंगलावर अतोनात प्रेम असते. आदिवासींच्या डोंगरी देवाला या परिसरात मावल्या देखील म्हणतात. तसेच, स्मृतीशिळा उभारण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक गावांंमध्ये मोठमोठे दगडी स्तंभ बघावयास मिळतात. वरगळ, चिरा, स्मृतीशिला, स्तंंभ, देवळी, सतीशीळा, समाध्या, थडी, छत्र्या, तुळशी वृंदावने आदी स्मृतीशिलाचे प्रकार येथे बघावयास मिळतात.


प्राचीन काळापासून आदिवासी समाज हा निसर्गाची आराधना व साधना करणारा प्रामाणिक समाज राहिला आहे. त्याचीच अनेक उदाहरणे आजही बघावयास मिळतात. बोहाडा, भित्तचित्रे, आदिवासी नृत्य, आदिवासी संंगीत आणि बरेच काही सह्याद्रीमध्ये दिसते. पारंपरिक भारतीय चित्रकला शैली भारताच्या चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा पुरावा आहे. मधुबनी आणि कलमकारीपासून वारली आणि पट्टाचित्रापर्यंत, या कलाकृती देशाच्या कलात्मक परंपरा, आध्यात्मिक विश्वास आणि दैनंदिन जीवनाचे प्रदर्शन करतात अशा लोकजीवनाशी निगडीत सह्याद्री थक्क करणारे आहे.

प्रा. आनंद बोरा – अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या