Friday, September 20, 2024
Homeनाशिकदेशदूत उद्योजक पुरस्कारांचे आज वितरण

देशदूत उद्योजक पुरस्कारांचे आज वितरण

'लीगल पोर्टल' चेही उद्घाटन

नाशिक | Nashik
उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना आपल्या उद्योगाच्या कक्षा रुंदावणाऱ्या व त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या उद्योजकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने दैनिक ‘देशदूत’कडून पहिला ‘देशदूत उद्योजक पुरस्कार’ देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे शुक्रवारी (दि.२०) दुपारी ४ ते ६ दरम्यान जेनकोवालचे अध्यक्ष दीपक घैसास व पॉझिटिव्ह मीटरिंग पंप कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मुतालिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होत आहे. अध्यक्षस्थानी ‘देशदूत’ वृत्त समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा राहणार आहेत.

या कार्यक्रमात ‘देशद्ध लीगल पोर्टल’चे उद्घाटन करण्यात येणार आहे. या ‘देशदूत उद्योजकता पुरस्कार’ सोहळ्याचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स व सहप्रायोजक अशोका बिल्डकॉन यांचे मोलाचे योगदान आहे.

यशस्वी उद्योजकता पुरस्कारासाठी विविध सहा उद्योग क्षेत्रातील कर्तृत्ववान उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी निवडलेल्या परीक्षक मंडळावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन मनीष कोठारी, सुला विनियार्डचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर, आयमा अध्यक्ष ललित बूब व एव्हिएशन उपसमितीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी चोख भूमिका बजावली आहे.

सहा उद्योग क्षेत्रातील विजेते
एस.एम.ई. टू लार्ज उद्योग:
१. दिलीप गिरासे – नीलय इंडस्ट्री
२. टाइम्स लाईफस्टाईल – सुमित तिवारी
ॲग्रो व फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री:
१. फूडस् ॲण्ड इन-मिलन दलाल
२. सिमला फूड प्रॉडक्ट- राजाभाऊ नागरे
इमर्जिंग इंडस्ट्री:
१. युनायटेड हिट ट्रान्सफर लिमिटेड- विवेक पाटील
२. गोल्डी प्रिसिजन – सिद्धेश रायकर
३. मेटाफोर्ज इंजि. – कौस्तुभ मेहता
वूमन एंटरप्रेनर्स:
१. ॲसेंट टेक्नोक्रेट- सारिका दिवटे
२. जयश्री इंडस्ट्री – जयश्री कुलकर्णी
स्टार्टअप ॲण्ड इन्होवेशन:
१. कॅटस् ग्लोबल- बिरेन शहा
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
१. नेटविन सॉफ्टवेअर – अरविंद महापात्रा
२. ॲल्युमिनस- रिषिकेश वाकतकर
३. पॉईंटस् मॅट्रिक्स- निरज बोरखाल

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या