नाशिक | प्रतिनिधी Nashik
दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’मध्ये प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, रविवारी सुटीचा मुहूर्त साधत नाशिककरांनी ब्रम्हेचा इस्टेट येथे गर्दी केली. उद्या (दि.२६) या भव्य प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
गंगापूर रोडसह आनंदवल्ली, सिरीन मेडोज, धृवनगर आणि चांदसी शहराच्या हॉट-स्पॉट मानल्या जाणाऱ्या भागांतील प्रकल्प एकाच ठिकाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.’दीपक बिल्डर्स’ आणि ‘ठक्कर ग्रुप’ सारख्या नामांकित बांधकाम व्यावसायिकांसह २६ हून अधिक आघाडीच्या बिल्डर्सनी आपले प्रकल्प येथे मांडले आहेत. सामान्य नाशिककरांच्या बजेटमधील घरांपासून ते अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशा लक्झरी पेंटहाऊस आणि विलापर्यंतचे सर्व पर्याय येथे पाहायला मिळत आहेत.
तिसऱ्या दिवशीही विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.उद्या (दि. २६) प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. ज्यांना अद्याप भेट देता आली नाही, त्यांच्यासाठी उद्याचा चा दिवस निर्णायक ठरणार आहे. विशेष म्हणजे, अनेक प्रकल्पांवर प्रदर्शनानिमित्त विशेष सवलती आणि आकर्षक ऑफर्स देखील येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे मागरिकांनी ब्रम्हेचा इस्टेट, सावरकर नगर कॉर्नर, भोसला मिलिटरी कॉलेज समोर, गंगापूर रोड येथे दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रदर्शनाचे टायटल स्पॉन्सर ‘दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ तर को स्पॉन्सर ‘ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल)’ हे आहेत. येथे बजेट होमपासून ते अतिशय आलिशान फ्लॅट्स, रो-हाउसेस, रो बंगलो, तसेच एन.ए. प्लॉट्सचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
शॉपची विक्री
ग्राहक हरीश काळे यांनी राजेंद्र बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या धृवनगर, गंगापूर शिवार येथील अवधूत अपार्टमेंटमधील शॉप बुक केले. त्यांचे संचालक राजेंद्र सोनजे यांनी अभिनंदन केले.
नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल), पार्कसाईड रेसिडेन्सी, रोहन इंटरप्रायझेस, निशम डेव्हलपर्स, सेवा रियल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, साठे बिल्डर्स, की स्टोन कन्स्ट्रक्शन, आकार बिल्डकॉन, कोटकर ब्रदर्स, अर्बन साइट्स, अमित लाईफ स्पेस एलएलपी, ए.एम.आर. डेव्हलपर्स, अनंतारा, पूजा कन्स्ट्रक्शन्स, बी-ऑर्बिट ग्रुप, सी.डी.आय.एल.-फार्म प्लॉट्स, राजेंद्र बिल्डर्स, महाकाल बिल्डर्स, सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ऋषीराज बिल्डर्स, मिन्का रिव्हरडेल, नंदन बिल्डर्स, श्रीयोग बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री बालाजी डेव्हलपर्स, शिल्पा इस्टेट








