नाशिक | प्रतिनिधी Nashik
इंदिरानगर व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो 2026’चा शानदार समारोप करण्यात आला.
प्रदर्शनाच्या तीनही दिवस परिसरातील नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली.
पर्यावरणीय पार्टनर पपायज नर्सरी हे होते सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एक्स्पोला प्रभागाचे नगरसेवक चंद्रकांत खोडे नगरसेविका संध्या कुलकर्णी प्रभाग 31 च्या नगरसेविका वैशाली दळवी नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट तसेच शिवसेना(उबाठा) उपमहानगर प्रमुख विनोद दळवी या मान्यवरांनी भेट दिली.
आभार वार्ताहर किशोर चौधरी यांनी मानले. याप्रसंगी ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे जाहिरात सहाय्यक महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य, जाहिरात सहाय्यक महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, देशदूत डिजिटलचे उपसंपादक मानस जोशी, नावाचे सचिन गीते आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशरे, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे यांनी परिश्रम घेतले.




































