Monday, June 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआजपासून ‘देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’

आजपासून ‘देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दै. ‘देशदूत’ आयोजित तसेच क्रीश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रायोजित व सहप्रयोजक रोहन एंटरप्राइजेस असलेल्या इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो-2024 च्या माध्यमातून सामान्यांचे गृह स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे. आजपासून (दि. 3) रविवारपर्यंत (दि.5) इंदिरानगर येथील संताजी संकुल, कलानगर सिग्नल, इंदिरानगर-पाथर्डी रोड, कोटक महिंद्रा बँकेजवळ सुरू होत असलेल्या प्रॉपर्टी एक्सपोचे उदघाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी पाच वाजता होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनील गवादे, क्रिश ग्रुपचे संचालक मनोज भाई लडानी, रोहन इंटरप्राईजेसचे संचालक अविनाश शिरोडे, शिल्पा इस्टेट संचालक भाविक ठक्कर, एबीएच डेव्हलपर्सचे संचालक गोपाल अटल, श्याम सिल्क अँड सारीज् चे संचालक तुषार मणियार, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, ऍड शाम बडोदे डॉक्टर दिपाली कुलकर्णी, शिवसेना ठाकरे गटाचे सागर देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असतांना नाशिक शहरातील इंदिरानगर परिसराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉपिंग मॉल असो वा सुपर मार्केट, शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मोठमोठे हॉटेल्स, भव्यदिव्य गृह व व्यावसायिक प्रकल्प, आसपासच्या गावांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग, रिक्षा बसच्या फेर्‍यांसह शहरातील कोणत्याही भागात थेट जाण्यासाठीची उत्तम कनेक्टिव्हिटी, झपाट्याने विस्तार होणार्‍या या भागात सर्वकाही उपलब्ध आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्ड पर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते.

इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पोत नाशिक मधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे. सामान्यजनांना गृह स्वप्नाची पूर्ती करण्याची अनोखी संधी प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. मुख्य प्रायोजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक क्रीश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स हे आहेत. तर सहप्रयोजक रोहन एंटरप्राइजेस प्रोमोटर्स अँड बिल्डर्स आहेत. फायनान्स पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र तर, पर्यावरणीय पार्टनर पपायाज् नर्सरी हे आहेत. 3 ते 5 मे पर्यंत दररोज दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी दै ‘देशदूत’ आयोजित इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
क्रीश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, रोहन एंटरप्राइजेस प्रोमोटर्स अँड बिल्डर्स, ललित रुंगटा ग्रुप, सुविक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आनंद ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, डीएसजे ग्रुप, एलिका डेव्हलपर्स, हरी ओम ग्रुप, सुर्या प्रॉपर्टीज, अर्बन साईट्स, आशापुरी कन्स्ट्रक्शनस, वास्तू बिल्डकॉन, युनिक सोलर सिस्टीम

- Advertisment -

ताज्या बातम्या