नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिककरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’ने आयोजित केलेल्या ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आज (दि.१३) अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन झाले.
इंदिरानगरमधील रथचक्र हौसिंग सोसायटीजवळील अजय मित्रमंडळ पटांगण येथे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी नाशिककरांनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्य डॉ दिपाली कुलकर्णी. नगरसेवक अॅड अजिंक्य साने, नगरसेविका सुप्रिया खोडे, नावाचे माजी उपाध्यक्ष सचिन गीते, संजय गायकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. सहसंपादक प्रताप जाधव यांनी प्रास्ताविक केले.
इंदिरानगर आणि परिसरातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी वाढ होत असून, याच संधीचा लाभ ग्राहकांना करून देण्यासाठी या प्रदर्शनात इंदिरानगर, पाथर्डी फाटा, गोविंदनगर आणि अशोका मार्ग यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागातील नामवंत बांधकाम व्यावसायिक आपले प्रकल्प घेऊन सहभागी झाले आहेत.
या प्रदर्शनामुळे एकाच छताखाली नाशिककरांना आपल्या बजेटनुसार आणि पसंतीनुसार दर्जेदार घरांची निवड करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दै. देशदूतचे जाहिरात सहायक महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य, वसुली व्यवस्थापक ज्ञानेश्वर नागरे, श्रीजी ग्रुपचे मयूर वर्मा, आनंद ग्रुपचे महेश जोशी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, समीर पाराशरे, आनंद कदम, वार्ताहर किशोर चौधरी, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी तर, अमोल घावरे यांनी आभार मानले.
पपायाज नर्सरी या प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर आहेत. प्रदर्शन रविवार, १५ मार्चपर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार असून, जास्तीत जास्त नाशिककरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
श्रीजी ग्रुप, सुविक बिल्डकॉन, रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अनमोल नयनतारा, आनंद ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हपलपर्स, श्याम ग्रुप, श्री दत्तकृपा बिल्डर्स, दीप कन्स्ट्रक्शन, यशश्री कन्स्ट्रक्शन, संकलेचा बिल्डर्स, आदित्य डेव्हपलपर्स, आयएनडी डेव्हपलपर्स, जयप्रसाद कन्स्ट्रक्शन अँड डेव्हपलपर एलएलपी, त्रिणीती रिअल्टर्स, सचिन पी. बागड इंजिनिअर्स, बिल्डर्स अँड डेव्हपलपर्स, आशापुरी कन्स्ट्रक्शनस,
सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांना हक्काचे घर घेण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत मात्र सर्व ठिकाणी जाणे शक्य नसल्याने एकाच छताखाली ग्राहकांना आपल्या मनाप्रमाणे घर निवडण्याची संधी ‘देशदूत’मुळे उपलब्ध झाली आहे.
-अॅड अजिंक्य साने
इंदिरानगर ला नाशिकची सदाशिव पेठ म्हणतात तसेच या भागाचा विकासही वेगाने होत आहे. त्यामुळे येथे विविध बिल्डर्सचे अनेक प्रकल्प सुरू आहे या सर्व प्रकल्पांची माहिती ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार असल्याने, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे देशदूतला मनःपूर्वक शुभेच्छा.
-डॉ. दिपाली कुलकर्णी












