नाशिक | Nashik
महिला सबलीकरण-सक्षमीकरणासाठी प्रेरणा देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वावर शाबासकीची थाप देणारा ‘देशदूत कर्मयोगिनी’ पुरस्कार सोहळा आज (दि. २० ) साजरा होत आहे. १३ श्रेणींमधील १३ यशस्विनींना प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते कर्मयोगिनी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहेे.
यावेळी देशदूत वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा व सौ. सुनीता विक्रम सारडा यांची प्रमुख उपस्थिती असेल. सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कामाशी बांधिलकी असलेल्या महिलांचे कर्तृत्व सर्वांसमोर येणार असून, कर्मयोगिनींच्या पाठीवर देशदूततर्फे शाबासकीची थाप देण्यात येणार आहे.
सेडॉर हॉल, नासिक्लब, नंदिनी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड येथे पार पडणाऱ्या सोहळ्यात प्रमुख अतिथीच्या हस्ते देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून कर्मयोगिनी निवड समितीच्या कांता राठी, डॉ.रविराज खैरनार, डॉ. स्मिता अमृते, ज्ञानेश उगले, आर्किटेक्ट ओजश्री सारडा, दीपाली खेडकर, रुचिता ठाकूर, अविनाश खैरनार यांनी काम पाहिले.
कर्मयोगिनी पुरस्कारार्थीं
शैक्षणिक – स्वाती गायकवाड
आरोग्य – डॉ. अनिता दौंड
क्रीडा – गीतांजली सावळे
राजकीय – पल्लवी भरसट
शासकीय (वनविभाग) – सीमा मुसळे
सामाजिक – मनीषा पोटे
महिला सबलीकरण – अंजुम कांदे
उद्योग – पल्लवी उटागी
कृषी – सरला चव्हाण
सोशल मीडिया – सिद्धी आंबेकर
पर्यावरण – डॉ. शिल्पा डहाके
कला – राधिका गोडबोले
जीवनगौरव – उर्मिला नाथानी