एकांत
जगायचं थोडं राहूनच गेलं
सोबत फिरायचं थोडं राहूनच गेलं
- Advertisement -
नव्यानेच थाटला तुझ्यासोबत संसार
सोबत बाळगूनच होते माहेरचे संस्कार
माहेरचा उंबरठा ओलांडून आले तुझ्याघरी
बनले होते तुझ्या मनाची स्वप्नसुंदरी
हळूहळू संसार आपला लागला पळू
हळूहळू आपलीही गाडी लागली रुळू
दिवसेंदिवस तू राहू लागलास बिझी
मीही बनत गेले बघ एकदम चुझी
एकांत आपणास न मिळू लागला
मीही त्याचा खूप पाठलाग केला
त्या एकांता साठी खूप झटू लागले
मी माझी मलाही मग विसरू लागले
पळून पळून खूप तुझ्यामागे थकले
मग क्षणभर कुठेतरी थांबावे वाटले
मनाला ओढ खूप लागली होती
तुझ्याच प्रेमाची ती तृष्णा होती…
– हेमलता खैरनार, मंगेशी धाम, कल्याण