Friday, May 3, 2024
Homeजळगावमहिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे

महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

आजच्या युगात महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत मात्र असे असतानाही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलविला पाहिजे असा सूर देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्यावर उमटला

- Advertisement -

आदिशक्तीचा जागर या विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी संवादक कट्ट्यावर उडान संस्थेच्या हर्षाली चौधरी, कायदेतज्ञ ज्योती भोळे ,कायदेतज्ञ स्वाती निकम ,निधी फाऊंडेशनच्या वैशाली विसपुते सहभागी झाल्या होत्या यावेळी संपादक हेमंत अलोने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना हर्षाली चौधरी म्हणाल्या की महिलेचा जन्म सोज्वळतेसाठी झाला आहे . प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत मात्र अजूनही महिलांना समानतेने वागवण्याची ची गरज आहे.दृष्टी बदलवून उपयोग नाही तर दृष्टिकोन बदलला पाहिजे .आजही दिव्यांग मुलींना समाज स्वीकारायला तयार नाही.

फक्त पुरुषांनीच नाही तर महिलांनी देखील बदलणे गरजेचे आहे .ज्योती भोळे म्हणाल्या की महिलेला निश्चित च समानतेचा अधिकार आहे .मात्र महिलांना सन्मानाने वागविले तरच समानता टिकेल .संविधानांने जसे महिलांना अधिकार दिले आहेत तसेच कायदे महिलांसाठी निर्माण झाले आहेत .

मात्र या कायद्याचा वापर करताना महिलांना शिक्षणाचा मोठा अडसर ठरतो .कायदे असले तरी त्या कायद्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया फार मोठी आहे .त्यामुळे बरेचदा महिला मागे राहतात स्वाती निकम म्हणाल्या की ,स्त्री सक्षम आहे आणि ती सर्वांचेच रक्षण करते .

महिलांसाठी कायदे भरपूर आहेत.महिला सुरक्षित राहण्यासाठी वैचारिक समानता येणे गरजेचे आहे .महिलेला महिला म्हणून सन्मान मिळणे गरजेचे आहे तेव्हाच महिला सुरक्षित होणार आहे.

घरातूनच महिलांविषयी भेदभावाला सुरुवात होते .महिलांना राजकारणात आरक्षण असले तरी त्या फक्त सह्याजीराव आहेत .मुली आणि मुलांमध्ये भेदभाव केला जातो.असे असेल तर समानता काशी येईल असेही त्या म्हणाल्या .

- Advertisment -

ताज्या बातम्या