नाशिक । प्रतिनिधी Nashik
उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ आयोजित तसेच ‘ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ प्रायोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ प्रदर्शनाला शानदार सुरुवात झाली आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रुचिका महिला मंडळाच्या विश्वस्त सीमा कलंत्री, सुरेखा सोमाणी, अध्यक्षा अरुणा कलंत्री, उपाध्यक्षा निकिता, तसेच सदस्य श्वेता कलंत्री, हेमा बूब, मनीषा भराडीया, शांता राठी, शारदा केला, भारती कासट, इंदू जाजू, सुनंदा मालपाणी, रंजना चांडक, पद्मा भुतडा, नेहा झंवर, पुष्पा लाहोटी, आरती भुतडा, तसेच, ए.सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक अशोक जैन विश्वकर्मा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक प्रसाद कांत, शिल्पा इस्टेटचे संचालक भाविक ठक्कर आदींच्या उपस्थितीत फीत कापून एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला.दैनिक ‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले.
पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे आयोजन नाशिकरोड, जेलरोड येथील मनपा आरक्षित नियोजित नाट्यगृह जागेच्या मोकळ्या भूखंडावर करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे २५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पाहुण्यांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. तसेच स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला.
प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (दि. ११ जानेवारी) दुपारी 2 ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी देशदूतचे सहायक जाहिरात महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर आनंद कदम, भगवंत जाधव, समीर पाराशरे, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे यांनी परिश्रम घेतले. वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी मानले.
‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिकरोड येथील गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेले प्रसिद्ध ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत. तसेच बँक तर पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी हे आहेत. रविवार (दि.११) पर्यंत दररोज दुपारी 2 ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रुचिका महिला मंडळ गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. विविध कार्यात आमच्या मंडळाच्या पदाधिकारी व महिला नेहमी अग्रेसर असतात. देशदूत ने प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन अतिशय उत्तम पध्दतीने केले आहे. यामुळे ग्राहकांना उत्तमोत्तम आणि बजेटनुसार घर निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्राहकांना या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होणार आहे मात्र, बांधकाम व्यावसायिकांना देखील एक्स्पोमुळे आपले विविध प्रकल्प ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.
अरुणा कलंत्री



































































