Sunday, March 30, 2025
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : अभूतपूर्व प्रतिसादात 'देशदूत' नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्सपोची सांगता

Photo Gallery : अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत’ नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्सपोची सांगता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नवीन नाशिक व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘देशदूत’ आयोजित व भाविक ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत, सहप्रयोजक राजश्री प्रॉपर्टीज्, ‘नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो- २०२४’चा शानदार समारोप करण्यात आला.

- Advertisement -

प्रदर्शनाच्या तीनही दिवस नवीन नाशिक व परिसरातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने ग्राहकांनी आश्वासक वाटचाल केली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या ‘देशदूत नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. एक्स्पोचे पर्यावरण पार्टनर पपायाज् नर्सरी हे होते.

स्वप्नपूर्ती शक्य

सद्यस्थितीत बांधकाम व्यवसायाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळण्यास एक्स्पोची भूमिका महत्त्वाची वाटली. घर व त्यासंबंधीचे पूरक पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने गृहस्वप्नपूर्तीची प्राथमिकता शक्य झाली आहे.

– सोहम खैरनार

ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी ‘देशदूत’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाहिले पाऊल टाकण्यात खूप मदत मिळाली त्याबद्दल ‘देशदूत’चे आभार व्यक्त करते.

– रत्ना आहेर

नेटके आयोजन होते त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती मिळण्यास मदत झाली. एक्स्पोमधील काही प्रकल्प बजेटप्रमाणे तसेच जसे अपेक्षित होते तसे वाटल्याने आम्ही तिथे भेट देणार आहोत. ‘देशदूत’चे मनःपूर्वक आभार.

-मनोज चव्हाण

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...