Saturday, April 26, 2025
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : 'देशदूत' नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोला शानदार सुरुवात

Photo Gallery : ‘देशदूत’ नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोला शानदार सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित व भाविक ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत, सहप्रयोजक राजश्री प्रॉपर्टीज्, ‘नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

- Advertisement -

आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाविक ग्रुपच्या संचालिका संगीता शहा, राजश्री प्रॉपर्टीजचे संचालक अमोल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रारंभी ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे संचालक विक्रम सारडा, मार्केटिंग महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. रविवार (दि.२५ फेब्रुवारी ) पर्यंत तीन दिवसांत प्रदर्शनाचे आयोजन पवन नगर येथील, त्रिमूर्ती चौक- अंबड लिंकरोड येथील मोकळ्या भूखंडावर, भोळे मंगल कार्यालयाजवळ करण्यात आले आहे. दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश आहे. घर असो वा दुकान सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रदर्शनात नाशिक शहरातील त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर पपायाज् नर्सरी आहेत. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्य बातमीदार रवींद्र केडीया यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी दै ‘देशदूत’चे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, ग्रामीण व्यवस्थापक सचिन कापडणी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर समीर पाराशरे, भगवंत जाधव, आनंद कदम, रोशन कुटे, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे यांनी परिश्रम घेतले. जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी आभार मानले.

मुंबई पुणे नंतर नाशिक या महत्वाच्या शहराची झपाट्याने वाढ होत आहे. सवलतीच्या दरात घर, दुकाने उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना याचा अजून जास्त फायदा होईल. स्वतःचे घर असावे हे सर्वांचे स्वप्न असते. हे साकार करण्यासाठी ‘देशदूत’ ने आयोजित केलेल्या एक्स्पोमुळे मदत होणार आहे.

-आमदार सीमा हिरे

ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये योग्य समन्वय साधला जाणार आहे. ग्राहकांना येथे एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध आहेत. ‘देशदूत’ने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यायला हवा.

-संगीता शहा

अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून नवीन नाशिक आणि परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. नाशिकरोड परिसरात नाशिकच्या विकासकांनी विकसित केलेले प्रकल्प नाशिककरांनी आवर्जून बघायला यावे. ‘देशदूत’च्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.

-अमोल शेंडे

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

‘देशदूत नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2024’ मध्ये भाविक ग्रुप, राजश्री प्रॉपर्टीज, सुविक बिल्डकॉन, सुमित बिल्डकॉन, श्रीमंगल ग्रुप, हरी ओम ग्रुप, निशिगंधा अपार्टमेंटस् , बीवाय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सुर्या प्रॉपर्टीज, न्यू पवनपुत्र डेव्हलपर्स, अवध ग्रुप अक्षर बिल्डर्स, विहान ग्रुप बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स, युनिक सोलर सिस्टीम, डील कन्स्ट्रक्शन, सी. बी. कन्स्ट्रक्शन इत्यादी नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

तडीपार गुन्हेगाराची हत्या

0
  Crime-Murder-Sinnar-Vavi वावी । वार्ताहर Vavi तडीपारीची शिक्षा भोगून परत आलेल्या प्रवीण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर (27) याचा तालुक्यातील शहा येथील घरात शिरून गावातीलच 14 मुलांनी कोयता,...