Wednesday, May 29, 2024
HomeनाशिकDeshdoot News Impact : ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात

Deshdoot News Impact : ड्रेनेज लाईनच्या कामास सुरुवात

इंदिरानगर । प्रतिनिधी Indira Nagar

वासननगर पोलीस वसाहतीजवळ असलेल्या कॉलनीमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत मनपा प्रशासनाने या ठिकाणी आणखी ड्रेनेज लाईन सुरु करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी दै. ‘देशदूत’ने रहिवाशांच्या समस्याला वाचा फोडली होती.

- Advertisement -

पाथर्डी परिसरातील वासननगर येथे पाण्याच्या टाकीजवळ बंगले व रो-हाऊस आहेत. या कॉलनीमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जमत होते. काही वेळेस हे पाणी रो- हाऊस व बंगल्यांमध्ये ही घुसत असल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्या संदर्भात येथे कॉलनी परिसरातील रहिवाशांनी निवेदने देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. यात दत्ता मते, युवा स्वाभिमानी पार्टीच्या राजलक्ष्मी पिल्ले तसेच ऋषभ शर्मा, सागर थोरात, सागर दुसाने, यश थोरात, सुरेश पवार यांनी निवेदने देऊन मागणी केलेली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या