देवळाली कॅम्प । प्रतिनिधी
येथील कॅन्टोन्मेन्ट बोर्ड वॉर्ड क्र. चारमधील सहा नंबर नाका ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून पायी चालणे तर सोडाच, दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले होते.
महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठमोठी प्रकल्पांची बांधकामे होत असून याच रस्त्यावरून मोठमोठी अवजड वाहने ये-जा करत असल्याने या रस्त्याची बिकट अवस्था झाली होती. खा. हेमंत गोडसे यांनी तब्बल 9.50 कोटी रु.शहरातील विविध रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिले असतांना जाणूनबुजून हा रस्ता करण्याचे टाळले जात होते.असा आरोप नागरिकांनी केला होता. त्वरित रस्ता दुरुस्त करावा, अशी रहिवाशांची मागणी होती.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
याबाबत दै ‘देशदूत’ वृत्तपत्रामध्ये बुधवार (दि. 19) रोजी प्रसिद्ध होताच कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेऊन काल (दि. 21) पासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. तर नागरिकांनी दै ‘देशदूत’चे आभार मानले.