Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्याDeshdoot News Impact : ‘त्या’ परवानगीची चौकशी करणार : अपार

Deshdoot News Impact : ‘त्या’ परवानगीची चौकशी करणार : अपार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

लखमापूर (Lakhmapur )येथे ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावाच्या पूर्वेस गट नंबर 236 मध्ये गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या सार्वजनिक विहिरीजवळील केमिकल युक्त कंपनीला ग्रामस्थांचा विरोध असतांना परवानगी दिली गेली. ती परवानगी रद्द करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा लखमापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योती वि. देशमुख यांनी दिला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्याबाबत सविस्तर वृत्त दैनिक ‘देशदूत’ने प्रसिध्द करताच दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी दखल घेत त्या कंपनीला परवानगी कोणत्या अनुषंगाने दिली याची चौकशी करुन प्रदूषण महामंडळाकडे पत्र व्यवहार करण्यांत येणार असल्याचे आश्वासन उपविभागीय अधिकार्‍यांनी दिले.

केमिकल उद्योग व इतर उद्योगास ना हरकत देवू नये, तसेच त्यासंदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर विशेष ग्रामसभा घेऊन गावाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, याबाबत प्रांत अधिकारी व ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. यावर लखमापूर ग्रामपंचायतीने मासिक ठराव तसेच ग्रामसभेचे ठराव करत या कंपनीस विरोध केला होता. परवानगी देण्याअगोदर त्या कंपनीचा उद्देश आणि त्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती ग्रामसभेला दिले.

विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्या कंपनीला परवानगी द्यावी असा ठराव झालेला असतांना तरी देखील या कंपनीला कोणत्या आधारे परवानगी देण्यात आली असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर ज्योती देशमुख उपविभागीय अधिकार्‍यांची भेट घेत त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यावर तत्काळ त्या प्रकरणाची चौकशी करुन प्रदुषण महामंडळाकडे पत्र व्यवहार करुन गावाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी दिले.

ग्रामसभा, मासिक सभेमध्ये विरोध करुनही कंपनीला परवानगी कशी दिली जाते ? याची चौकशी उपविभागीय अधिकार्‍यांनी लावली तरी त्यातून ग्रामस्थांना न्याय मिळेल की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...