नाशिक | प्रतिनिधी Nashik
पंचवटीच्या नवीन आडगाव नाका, जत्रा चौफुली, रासबिहारी रोड, कोणार्क नगर, बळी मंदिर, छत्रपती संभाजी नगर नाका परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’चा शानदार समारोप करण्यात आला.
प्रदर्शनाच्या तीनही दिवस परिसरातील नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणाऱ्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. पर्यावरणीय पार्टनर पपायज नर्सरी हे होते. बांधकाम व्यावसायिक संस्थांचे ३० स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, रामलीला बँक्वेट हॉलचे संचालक विष्णु शिंदे, उत्तम शिंदे, माणिक शिंदे, ‘देशदूत’चे सहायक जाहिरात महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशरे, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे यांनी परिश्रम घेतले.
एक्स्पोत 5 घरांचे बुकिंग, येत्या काळात होणार आणखी बुकिंग
स्काय वर्ड बिल्डकॉनच्या मधुवन बंगलोज या थ्री बीएचके कॉर्नर बंगलोज प्रकल्पातील 19 00 स्क्वेअर फुटचा थ्री बीएचके रो बंगलोचे बुकिंग निलेश हिरे या ग्राहकांनी केल्याची माहिती सुजय सोनार यांनी दिली. त्याचप्रमाणे येत्या हप्त्यात आणखी ग्राहक बुकिंग करणार असल्याचेही सोनार यांनी सांगितले. तसेच नेरकर प्रॉपर्टीजच्या गणेश प्रोस्पेरा या प्रकल्पातील टू बीएचके फ्लॅटचे बुकिंग सतीश देवगिरे या ग्राहकांनी केल्याचे संचालक अभय नेरकर व विपुल नेरकर यांनी सांगितले. एकूणच प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये अपेक्षे पेक्षा प्रचंड प्रमाणात स्टॉल धारकांना ग्राहकांचा प्रतिसाद लाभला. एक्स्पोपासून अगदी हाकेच्या अंतरावर अनेक साईट सुरू आहेत. त्यामुळे त्वरित साईट व्हिजिटची व्यवस्था करण्यात आली. भेट देणाऱ्या ग्राहकांना प्रकल्प आवडल्याचे स्टॉल धारकांनी सांगितले.





