Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजउद्यापासून ‘देशदूत पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’

उद्यापासून ‘देशदूत पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’

हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दै. ‘देशदूत’ आयोजित पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो 2025 च्या माध्यमातून सामान्यांचे गृहस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे. उद्या (दि.28) पासून रामलीला बँक्वेट हॉल, जत्रा चौफुली, नांदूर नाका लिंक रोड, आडगाव शिवार, पंचवटी येथे सुरू होत असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता होणार आहे. हा एक्स्पो रविवार दिनांक 30 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

- Advertisement -

कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून नाशिक मनपा स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, नाशिक भाजप उपाध्यक्ष धनंजय माने, माजी नगरसेविका प्रियंका माने, माजी नगरसेविका शीतल माळोदे, नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. वैभव शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असतांना नाशिक शहरातील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीने विभागाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी-निमसरकारी आस्थापना, शाळा, महाविद्यालय, आसपासच्या गावांना जोडणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या बाजारपेठा, शेतीप्रधान परिसर यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पंचवटीच्या नवीन आडगाव नाका, जत्रा चौफुली, रासबिहारी रोड, कोणार्कनगर, बळी मंदिर, छत्रपती संभाजीनगर नाका आदी भागातील अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे.

प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी हे आहेत. प्रॉपर्टी एक्स्पोत नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे 30 स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे. सामान्यजनांना गृहस्वप्नाची पूर्ती करण्याची अनोखी संधी प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. 30 मार्च 2025 पर्यंत दररोज दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये पार्कसाईड, ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कीस्टोन कन्स्ट्रक्शन, फोर्थ डायमेंशन प्रॉपर्टीज, दक्ष रिअल्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ग्रोवर्थ रिअल सोल्यूशन्स प्रा. लि., पुष्प्रीत रिअल्टी, सोमविजय कन्स्ट्रक्शन, ओंकारेश्वर इन्फ्राटेक, कनकलक्ष्मी डेव्हलपर्स, विहान ग्रुप बिल्डर-लँड डेव्हलपर, शेठ रिअल्टी, क्रिश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, समर्थ ग्रुप, सचिन पी. बागड इंजिनिअर्स-बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नेरकर प्रॉपर्टीज, आशापुरी कन्स्ट्रक्शन्स, स्कायवर्ड बिल्डकॉन, श्याम ग्रुप, स्कायवार्ड बिल्डकॉन हे नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...