Saturday, July 27, 2024
Homeनाशिकआजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

आजपासून ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘देशदूत’ आयोजित तसेच ‘ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सफ’ प्रायोजित ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ च्या माध्यमातून सामान्यांचे गृह स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisement -

आजपासून (दि.8) पंचवटी येथील एस. एल. के. प्रॉपर्टीज, राज स्वीट्ससमोर,आरटीओ कॉर्नर, दिडोरीरोड येथे सुरू होत असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता होणार आहे. हा एक्स्पो रविवार दि. 10 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महापालिका स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते, माजी नगरसेवक अरुण पवार, जगदीश पाटील, बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर सी.बी. सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असतांना नाशिक शहरातील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी विभागाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्डपर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते. सरकारी-निमसरकारी आस्थापना, शाळा महाविद्यालय, आसपासच्या गावांना जोडणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोठ्या बाजारपेठा, शेतीप्रधान परिसर यामुळे रहिवासी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पंचवटी भागातील अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे.

प्रॉपर्टी एक्स्पोत ललित रुंगटा ग्रुप, हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., की स्टोन कन्स्ट्रक्शन, गिरिजात्मज प्रॉपर्टीज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एसी जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सोमविजय कन्स्ट्रक्शन्स, ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, हरी ओम ग्रुप, अनुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शेठ बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स, ए. आर. डेव्हलपर्स, आशापुरी कन्स्ट्रक्शन, स्वामी डेव्हलपर्स, अनुपम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, पुष्प्रीत रियल्टी आदी नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे. सामान्यजनांना गृहस्वप्नाची पूर्ती करण्याची अनोखी संधी प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे.

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर सहप्रयोजक हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. हे आहेत. तसेच फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र आहे. 10 डिसेंबरपर्यंत दररोज दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी्ग ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या