
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक महानगर आणि जिल्ह्यात अनेक नामवंत डॉक्टर सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ’डॉक्टर्स दिना’चे औचित्य साधून ‘जीवन संजीवन पुरस्कार’ सोहळा दै. ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
आज (दि.5) विभागीय महसूल आयुक्त तथा सिहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. निलेश निकम या मुख्य अतिथींच्या हस्ते पाच विविध ज्येष्ठ डॉक्टरांना ‘देशदूत जीवन गौरव’ तर विविध उपचार पद्धतीतील सोळा तज्ज्ञ डॉक्टरांना ‘जीवन संजीवन पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
समाजातील डॉक्टरांच्या भूमिकांचे महत्त्व ओळखण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी एक जुलै हा ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा पुरस्कार सोहळा आज नाशिक-पुणे रोडवरील नाशिक्लब येथे सायंकाळी पाच वाजेपासून रंगणार आहे. या सोहळ्यास नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
जीवनगौरव पुरस्कार
डॉ. अनिल मर्चंट, मालेगाव, नाशिक
डॉ. के. डी. बुवा, नाशिकरोड, नाशिक
डॉ. विजया सुळे, नाशिक
डॉ. विजय बागरेचा, लासलगाव,नाशिक
डॉ. विश्वास देशपांडे, दिंडोरी, नाशिक
जीवन संजीवन पुरस्कार
सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक
श्री साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, निफाड
डॉ. नानासाहेब खरे, नाशिक
डॉ. अजित खालकर, सिन्नर
डॉ. ज्ञानेश निकम, नाशिक
डॉ. राहुल वैद्य, नाशिक
डॉ. अरुण थोरात, सिन्नर
डॉ. महेश मांगुळकर, नाशिक
डॉ. सत्यजित सोनजे, नाशिक
डॉ. संदीप गोसावी, दिंडोरी
डॉ. हितेश पाटील,नाशिक
डॉ. भारत अहिरे, नाशिक
डॉ. दिनेश बागुल,नाशिक
डॉ. योगिनी बागुल, नाशिक
डॉ. नंदकुमार पाटील, कळवण
डॉ. प्रशांत पिंगळ, दिंडोरी
डॉ. निलेश लोढा, नाशिक
डॉ. अनिल चौधरी, नाशिक
डॉ. निलेश निकम, नाशिक




