Thursday, November 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकमळाला मताधिक्क्य हीच खूणगाठ; जुने नाशिक-प्रभाग १४ मध्ये पदयात्रा

कमळाला मताधिक्क्य हीच खूणगाठ; जुने नाशिक-प्रभाग १४ मध्ये पदयात्रा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांनी निश्चय केला आहे. पक्षबदल करून जनतेची दिशाभूल करणार्‍यांना येथे बिलकुल थारा दिला जाणार नाही. कमळाला मताधिक्क्य देऊन प्रा. देवयानी फरांदे यांना विधानसभेत पाठवण्याची खूणगाठ मतदारांनी बांधली आहे. जुन्या नाशकातील प्रचारफेरीत स्पष्टपणे नागरिक आपले मत विकासाला, पक्षाशी एकनिष्ठ असणार्‍या उच्चशिक्षित उमेदवाराला असल्याचे सांगत होते.

मंगळवारी सायंकाळी जुन्या नाशकातील प्रभाग क्र. 14 मध्ये पदयात्रा काढण्यात आली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या या फेरीत विधानसभा प्रवासी नेता आमदार अमुल भाई भट्ट, भाजप शहर उपाध्यक्ष सुनील फरांदे, मध्य नाशिक विस्तारक पवन जाधव, अजिंक्य फरांदे, भाजप जुने नाशिक मंडल सरचिटणीस अ‍ॅड. पवन गुरव, उपाध्यक्ष रतन आप्पा काळे, गणेश मोरे, सचिन मोरे, कविता तेजाळे, पुष्पा बेग, शिवा जाधव, कैलास हादगे, निखिल पवार, चेतन शेलार, नीलेश शेलार, संदीप आहेर, संदीप डहाके, नितीन ठाकरे, रमेश मानकर, चेतन व्यवहारे, अथर्व करमासे,

अविनाश वाळुंजे, कैलास देशमुख, संतोष दाते, अमोल मानकर, चंदन भास्करे, यश शिंदे, लोकेश सूर्यवंशी, अर्जुन डांगरे, शोभा जाधव, शामकांत बोरदे, नीलेश राऊत, अतुल क्षीरसागर, गोविंद विधाते, ओम पवार, अतुल बस्ते, पवन लुंगसे, तानाजी अष्टेकर, विद्या काठवते, कृष्णा ठाकरे, ओमकार काळे, राहुल डहांके, युवराज तेजाळे, विकी जमदाडे, पार्थ मानकर, चेतन व्यवहारे, योगेश खैरनार, अनिकेत डांगरे, जय अहिरे, लोकेश सूर्यवंशी, वैभव पगारे, विकी सोपे, मयूर शिंदे आकाश कासार, विशाल प्रभाणे, नूतनकुमार जाधव, सचिन बेलदार, शिवदास भोई, दुर्गेश साळुंखे, विलास सनानसे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.
चव्हाटा भागातून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी घोषणा, प्रचार गाणी व जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला. छपरीची तालीम, बुधवार पेठेतील सुभाष वाचनालय, गजराज चौक, हुतात्मा शिरीषकुमार चौक, मोदकेश्वर वसाहत येथे उत्स्फूर्तपणे स्वागत झाले. सुवासिनी महिलांनी औक्षण करून लाडक्या बहिणीला शुभेच्छा दिल्या. नंतर या भागातील प्रसिद्ध कुंभारवाडा, काझीगढी, शितळामाता चौक, शिवदृष्टी प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद चौक, स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर देवस्थानतर्फे प्रा. फरांदे यांचे स्वागत, सत्कार करण्यात आले.

कोळीवाडा परिसर, प्रगती सोसायटी, शिवनेरीनगर, भगवतीनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दंडे हनुमान मंदिर देवस्थानतर्फे स्वागत झाले. बुरूड गल्ली, चौक मंडई या मुस्लीमबहुल परिसरात तेथील बांधवांनी सत्कार करून पाठिंबा असल्याचे सांगितले. महालक्ष्मी चाळ, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पदयात्रा पोहोचल्यावर भाषणे होऊन समारोप करण्यात आला. जुने नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक, लाडक्या बहिणी नवमतदार युवक, युवती व सगळ्या मतदारांचा सर्वत्र उत्साह दिसून आला. प्रभाग 14 मधून विक्रमी मतदान होण्याचा निर्वाळा अनेकांनी दिला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या