Friday, May 16, 2025
Homeनाशिकदेवळा घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अटकेत

देवळा घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अटकेत

देवळा |प्रतिनिधी|Devala

- Advertisement -

शहरातील  सप्तश्रृंगी नगरमधील झालेल्या घरफोडी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात देवळा पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडुन चार लाख ५८ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सागर खंडेराव पिंपळकर वय २० वर्षे रा. निवाणे ता. कळवण व ज्ञानेश्वर संजय वाघ वय १९ वर्षे रा. सप्तश्रृंगीनगर देवळा ता.देवळा या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

देवळा शहरातील सप्तश्रृंगी नगर मध्ये वास्तव्यास असलेले शांताराम राजाराम निकम यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे ५ लाख ५४ हजार ४०० किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता.याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ४५४, ३८०, ३४ प्रमाणे दि. ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देवळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर गुजर आणि पोलिस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सागर खंडेराव पिंपळकर आणि ज्ञानेश्वर संजय वाघ या संशयित चोरट्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली यावेळी चोरी केलेल्या सोन्या-चांदीचे दागीने कळवण, देवळा व मालेगाव येथे सराफ दुकानदारांना विकले होते त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ४ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल आरोपींकडून चौकशी करून शोधण्याचे काम सुरू आहे.सदर आरोपींना कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अवघ्या १५ दिवसांत घरफोडी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील,पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर,पोलीस नाईक राहुल शिरसाठ, ज्योती गोसावी, पोलीस शिपाई योगेश जामदार, शरीफ शेख,भाग्यश्री पवार यांनी यशस्वी कामगिरी निभावली. 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिवसेना

Shivsena-MNS Alliance: शिवसेना-मनसे युती होणार की नाही? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश;...

0
मुंबई | Mumbai कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर...