Monday, May 19, 2025
Homeनाशिकनमो तीर्थस्थळ सुधार अभियानातून होणार चिचोंडी राघवेश्वर महादेव मंदिर तीर्थ क्षेत्राचा विकास

नमो तीर्थस्थळ सुधार अभियानातून होणार चिचोंडी राघवेश्वर महादेव मंदिर तीर्थ क्षेत्राचा विकास

येवला | प्रतिनिधी | Yeola

- Advertisement -

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नमो तीर्थस्थळ सुधार अभियान ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करणे या योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील चिचोंडी येथील राघवेश्वर महादेव मंदिर या तीर्थ स्थळाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या माध्यमातून या तीर्थ स्थळाचा विकास करण्यात येऊन परिसरातील पर्यटनात अधिक वाढ होणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी नमो ११ सूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये ११ विविध अभियान राबविण्यात येत असून यामध्ये ‘नमो तीर्थस्थळ सुधार अभियान’ राबविण्यात येत आहे.

यामध्ये राज्यातील ७३ पवित्र ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील चिचोंडी येथील राघवेश्वर महादेव मंदिर या ऐतिहासिक मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या अभियांअंतर्गत चिचोंडी राघवेश्वर महादेव मंदिराचा तीर्थ क्षेत्राचा विकास होऊन येथील पर्यटनात अधिक वाढ होणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

84 लाख रुपये खर्चून ब्रिटिशांनी बांधलेल्या भंडारदरा धरणाला पूर्ण होणार 100...

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण उभारणीस यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशकालीन धरणाचा पाठीचा कणा आजही ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे....