पाचोरा । प्रतिनिधी
आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जुणू समीकरण असल्याचे मत माजी नगराध्यक्ष संजय गोहिल व्यक्त केले आहे. पाचोरा शहर हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात गतीने विकसित होणारे शहर बनले असून ते विकासाचे एक मॉडेल ठरेल असा दृष्टिकोन समोर ठेवून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने आम्ही शहराला देखणी रूप देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी सांगितले.
शहरातील रस्ते डीपीआर साठी 146 कोटी
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पाचोरा शहराची ओळख निर्माण झाली आहे . नगरपरिषद हद्दीतील व नव्याने विस्तारलेल्या शहरातील कॉलनी व वस्ती भागातील रस्त्यांची काँक्रिटीकरण करण्यासाठी पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून दोन टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला यात पहिल्या टप्प्यातील 42 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून नुकताच पुन्हा 104 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून या कामांना देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे फक्त शहर हद्दीतील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी तब्बल एकूण 146 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे शहराला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.
पायाभूत सुविधा सोबतच शहरातील व्यापार वृद्धीसाठी व व्यापार करणार्या उद्योजक व व्यापारी बांधवांसाठी हक्काची जागा असावी या भावनेतून किशोर आप्पा यांनी पाचोरा शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून पाच कोटी रुपये खर्चाचे स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या नावाने भव्य व्यापारी भवन उभारले असून यामुळे व्यापारी बांधवांची वर्षानुवर्ष असलेली मागणी पूर्णत्वास नेऊन व्यापारी बांधवांच्या सुख सोयीसह शहराच्या सौंदर्यकरणात देखील या टुमदार इमारतीने भर घातला आहे.
हिवरा नदीवरील उपयुक्त पुलांची निर्मिती
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्या हिवरा नदीवरील अतिशय कमी उंचीच्या जून्या पुलामुळे पावसाळ्यात पाचोरा शहर आणि कृष्णापुरी कडील भागाचा संपर्क सतत तुटलेला असायचा. दळणवळण व व्यापारावर याचा गंभीर परिणाम होत असे.हिवरा नदीला येणार्या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना उघड्या डोळ्यांनी पहाव्या लागत होत्या. दूरदर्शी नेता असलेल्या किशोर पाटील यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. शासन दरबारी सतत पाठपुरावा करून तब्बल 20 कोटी रुपये निधीतून कृष्णापुरीचा पूल, पांचाळेश्वर पूल तसेच स्मशानभूमी शेजारील पूल अशा तब्बल तीन पुलांची निर्मिती करण्यात आली.