Friday, April 25, 2025
Homeजळगावरावेर मतदारसंघाचा विकास हाच ध्यास - धनंजय चौधरी

रावेर मतदारसंघाचा विकास हाच ध्यास – धनंजय चौधरी

रावेर। प्रतिनिधी –

रावेर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून मतदार संघाच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी भावी काळात प्रयत्न करू असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिले. रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे प्रचारावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे रावेर मतदार संघातील उमेदवार धनंजय चौधरी यांचा प्रचार दौरा शुक्रवारी रावेर तालुक्यातील गावांमध्ये होता. प्रचार दौर्‍याला चोरवड येथून सुरुवात झाली. त्यांनंतर अजनाड, मोरगाव बुद्रुक, मोरगाव खुर्द, वाघोड, पुनखेडा, पातोंडी, निंभोरासिम, थेरोळा, धुरखेडा, बोहरडे, नांदूरखेडा, अजंदा या गावातील मतदारांच्या भेटी घेवून संवाद साधला. वाघोड येथे श्री कुवरस्वामी महाराजांचे दर्शन घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशदारास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ठीकठिकाणी महिलांनी उमेदवार धनंजय चौधरी यांचे औक्षण करीत विजयाचा आशीर्वाद दिला.

पुनखेडा येथे दुर्गा देवी मंदिर, बाल हनुमान मंदिर, श्री साईबाबा देवघर मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, प्रकाश मुजुमदार, माजी नगरसेवक एड योगेश गजरे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख योगिराज पाटील, राजीव सवरणे, गणेश बाजीराव पाटील, विनायक महाजन, डी एस चौधरी, डॉ. सुरेश पाटील खानापूर, चंद्रकांत पाटील, समाधान दिनकर पाटील, वसंत बाजीराव पाटील, लिलाचंद नाना पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...