Tuesday, December 3, 2024
Homeजळगावडोंगर कठोरा विकास सोसायटी राज्यात प्रथम

डोंगर कठोरा विकास सोसायटी राज्यात प्रथम

यावल – प्रतिनिधी Yaval

केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांचे कडून देण्यात येणारा क्षेत्रीय सहकारी उत्कृष्टता व श्रेष्ठता पुरस्कार 2021 या 2020-2021 सालासाठी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राज्यातून यावल तालुक्यातील डोंगर कठोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला प्रथम क्रमांक निवड झाली.

- Advertisement -

हा पुरस्कार यावल तालुका शेतकी संघाचे (Farmers Union) चेअरमन तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी डोंगर कठोरा तालुका यावल येथील माजी चेअरमन व विद्यमान संचालक अमोल भिरुड डोंगर कठोरा विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन शोभा भिरुड, व्हॉइस चेअरमन कल्पना राणे, सचिव विजयसिंह पाटील यांनी स्वीकारला. सदर पुरस्कार सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य अनिल कवाडे, चीफ जनरल मॅनेजर नाबार्ड महाराष्ट्र राज्य (NABARD State of Maharashtra) अभय देशपांडे, क्षेत्रीय आयुक्त मत्स्य विभाग पुणे कर्नल विनीत नारायण, जनरल मॅनेजर राष्ट्रीय सहकारी विकास निगम, पुणे. यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला सोबत या संस्थेला 25 हजार रुपयांचा धनादेशही संबंधित अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा बहुमान मिळाल्याबद्दल या संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डोंगर कठोरा येथील विकास सोसायटी ला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून या संस्थेने घेतलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गेल्या पन्नास वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले कर्ज हे शंभर टक्के परतफेड केलेली व संस्थेचे होणारे पारदर्शी कामकाज यामुळे या संस्थेची जळगाव जिल्हाभरातून नव्हे तर महाराष्ट्रातून नियुक्ती झाली आहे हा पुरस्कार मिळाल्यामुळे (jalgaon) जळगाव जिल्हाभरातून या संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या