Friday, March 28, 2025
Homeनाशिकविरोधी पक्षनेते फडणवीस, महाजन, रावल आज नाशकात

विरोधी पक्षनेते फडणवीस, महाजन, रावल आज नाशकात

नाशिक । प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरिश महाजन व जयकुमार रावल हे शनिवारी (दि.६) नाशिकमध्ये येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमीपूजन केले जाणार आहे. तसेच येत्या मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीचि सभापतीपदाची निवड होणार असून त्यादृष्टीने पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन रणणिती ठरवलि जाईल असे समजते…

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाच्याच्या विवाहाला उपस्थित राहणार आहेत. तर गिरिश महाजन व जयकुमार रावल यांच्या हस्ते शहरातील भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे भूमीपुजन केले जाणार आहे.

महापालिका निवडणूक काहि महिन्यांवर येऊन ठेपल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शहरातील विविध विभागात विकासकामांचा बार उडवला जाणार आहे. तसेच महापालिकेच्या स्थायी समिती पदाची निवडणूक येत्या मंगळवारी होणार असून राजकिय वातावरण तापले आहे.

मागील चार वर्षापासून स्थायी समितीची सत्ता भाजपकडे आहे. यंदा विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेने स्थायीची सत्ता खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. मात्र मनसेची टाळी घेत स्थायीत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची रणनिती आखली आहे.

त्यादृष्टीने भाजप स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन स्थायी सभापती पदी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाजप सदस्यच विराजमान झाला पाहिजे या दृष्टीने गिरिश महाजन व जयकुमार रावल हे स्थानिक नेत्यांची बैठक घेउन त्यांना मार्गदर्शन करतिल, असे सूत्रांकडून समजते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात सरपंच पदाच्या आरक्षणासाठी तयारी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार्‍या जिल्ह्यातील एक हजार 223 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने 5 मार्च रोजी...