Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याOBC Reservation : मागासलेपणाचा डाटा केंद्राकडे नाही, भुजबळांवर कुणाचा दबाब?; फडणवीस आक्रमक

OBC Reservation : मागासलेपणाचा डाटा केंद्राकडे नाही, भुजबळांवर कुणाचा दबाब?; फडणवीस आक्रमक

मुंबई | Mumbai

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून आज विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला घेरले….

- Advertisement -

भाजप (BJP) आमदारांनी आज सभागृहामध्ये ओबीसी बचाबच्या टोप्या परिधान करून प्रवेश केला. तर छगन भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) हीच टोपी परिधान केली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची सहकार्याचीच भूमिका आहे, मात्र राज्य सरकार (State Government) ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर आहे का? भुजबळांवर कुणाचा दबाव आहे का? सर्व निवडणुका (Elections) ओबीसींशिवाय व्हायला हव्यात का? तुम्ही टोपी घातली मात्र तुम्हाला कुणी टोपी घातलीये का? आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही सरकारला जाब विचारायला हवा. अंतरिम अहवाल सादर करताना काल सरकारची दमछाक झाली होती, असे ते म्हणाले.

मागासलेपणाचा डाटा केंद्राकडे नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय एकही निवडणूक व्हायला नको. निवडणुकांवर निवडणुका होत आहे. हे असेच सुरु राहिले तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, कोर्टाने म्हटले असेल तर नवीन आयोग नेमणूक करा, दोन महिन्यात काम होईल मात्र तोवर निवडणूक पुढे ढकला. एकही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नका, ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करा. या मुद्द्याबर आज संपूर्ण दिवस चर्चा केली तरी चालेल , असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या