Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: शेतकऱ्यांसह घरगुती वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, मोफत वीज योजनेचा मिळणार...

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांसह घरगुती वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, मोफत वीज योजनेचा मिळणार लाभ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच घरगुती वीज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभेत बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले. सर्वाधिक म्हणजे १६ हजार मेगावॅट वीज कृषीला देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना दिवसा ३६५ दिवस वीज मिळणार आहे. कोणालाही रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. १ कोटी ३४ लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौरकृषी पंप योजना आपण सुरू केली. ८ वर्षात राज्यात १ लाख ८४ हजार पंप बसवण्यात आले. मागील १ वर्षात पावणे तीन लाख पंप बसवले गेलेत. २ लाख ७५ हजार कृषी पंपामुळे १४ लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेत आपण देशात पहिल्या नंबरवर आहोत. १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांना १ हजार कोटीपेक्षा जास्त अनुदान देऊन रूफ सोलार योजनेचा लाभ दिलेला आहे. केंद्र शासनाच्या या योजनेच्या धर्तीवर राज्य नवीन योजना तयार करत आहे. आपल्याकडील घरगुती ग्राहकांच्या ७० टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट वीज वापरतात, त्यांच्यासाठी राज्याची योजना आम्ही करतोय. यामुळे हे ७० टक्के ग्राहक योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. ७० टक्के ग्राहक म्हणजेच जवळपास दीड कोटी ग्राहक पूर्णपणे वीजबिल मुक्त होतील असं त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा: Devendra Fadnavis: सुरेश भटांची कविता…जयंत पाटलांवर टिप्पणी; देवेंद्र फडणवीसांची सभागृहात चौफेर टोलेबाजी

विजेच्या किंमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून २०३० पर्यंत महाराष्ट्रातील ५२% वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून तयार केली जाणार आहे. यात सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि अन्य नवीकरणीय स्रोतांचा समावेश असणार आहे. १९४७ ते २०२२ पर्यंत ७५ वर्षात आपली ऊर्जा निर्मिती क्षमता ३६ हजार मेगावॅटची होती. आता गेल्या २ वर्षात ४५ हजार मेगावॅट क्षमता झाली. २०३० पर्यंत ही क्षमता ८१ हजार मेगावॅटपर्यंत वाढणार आहे. सध्या देशातील ६५ टक्के डेटासेंटरची क्षमता महाराष्ट्रात आहे. या इकोसिस्टममध्ये हरित वीज आपल्याला देता येणार आहे. पुढच्या ५ वर्षाकरता ४५ हजार मेगावॅटचे करार झालेत, ते आतापर्यंतच्या सर्वात कमी दरात झाले आहेत. वीज खरेदीचा दर आपण कमी केला आहे असे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...